Niranjan Pujari

Bio

* स्पर्श सुखाची भावना ही माणसाचिच नव्हे तर सम्पूर्ण जीवसृष्टिची मुलभुत गरज आहे. * मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या ! माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी वल्गना खरी ठरली तर मी प्रेषित ठरेन. * दहा रुपयांचा नारळ, पंचवीस रुपयांचे पेढे, पाच रुपयांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या माणसाला दोन रुपये एवढ्या साधनांवर माणूस देवळापर्यंत पोहोचतो. देवापर्यंत जातो का ??? * माणसाचा शिक्षण घेण्याचा, स्वतावर संस्कार घडवण्याचा आणि त्यातूनच व्यक्तिमत्त्व घडवण्याचा एक काळ असतो, नेमका तोच काळ त्याचा प्रेमातही पडण्याचा असतो आणि इथेच सगळा घोटाळा आहे. * ज्या राष्ट्राला घटना नसते तेथे घटनात्मक मार्गाने आंदोलन करण्याचा सल्ला हा मूर्खपणा आहे पण त्याचवेळी ज्या राष्ट्राला घटना आहे तेथे घटनात्मक मार्ग सोडून इतर मार्ग अवलंबणे हे चुकच नाही तर अक्षम्य गुन्हा आहे. * पोरगी म्हणजे वाऱ्याची झुळूक.. अंगावरून जाते.. अमाप सुख देऊन जाते पण धरून ठेवता येत नाही. * तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल काहीही करू शकत नसाल आणि त्याच गोष्टीबद्दल तुम्ही नाकारले जाणे म्हणजे नरक !!!! * व्यासपीठे म्हणजे अस्तित्वशोधाचे पंख कापून मुद्दाम दुबळ्या केलेल्या सामर्थ्याची चेष्टा करणारे कत्तलखाने असतात. * आठवणी वाईट असतील तर तसाही त्रास होतोच आणि आठवणी चांगल्या असतील तर ते क्षण आपल्या हातातून निसटून गेले म्हणून पुन्हा त्रासच होतो, एकंदरीत आठवणी या कधीही सुखद नसतात. * आयुष्य मोजताना शक्य झाले तर आयुष्याचे घनफळ मोजावे, ते शक्य नसेल तर निदान क्षेत्रफळ तरी मोजावे, फक्त लांबी किंवा रुंदी वरून आयुष्याचे खरे मोजमाप होऊ शकत नाही. * तारुण्य ही जगातील सगळ्यात सुन्दर गोष्ट असताना ती मुलाबालांवर का खर्च करावी??? * I never resist temptation because I have found that things that are bad for me do not tempt me. * देशभक्ति म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मी ज्या देशात जन्मलो तो देश जगातील इतर देशांपेक्षा श्रेष्ठ आहे ही भावना. * या जगात जोवर राष्ट्रवाद शिल्लक आहे तोवर शांतता अशक्य आहे आणि जोवर राष्ट्रांच्या अस्मिता आणि सीमा शिल्लक आहेत तोवर राष्ट्रवाद काढून टाकणे निव्वळ अशक्य. * माणसांची पालापाचोळयाप्रमाणे प्रमाणे उडून जाणारी आयुष्ये बघितल्यावर "कर्मण्ये वाधिकारस्ते...." वगैरे म्हणजे त्या देवाने मानवी जीवनाच्या अशाश्वततेची दिलेली कबुली आहे असेच वाटते.

Latest Insta posts

Current Online Auctions